नवी दिल्ली : देशात सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा वेग कमी होताना दिसत आहे. मात्र असे असले तरी मृतांच्या आकड्यात कोणतीही घट झालेली नाही. दरम्यान, करोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती आता कुठे कमी होतीय तोपर्यंत आरोग्य तज्ज्ञांकडून करोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा दिला जात आहे. ही तिसऱ्या लाटेत सर्वाधिक धोका लहान मुलांना असल्याचे सांगितले जात आहे.
करोनातून बरे होणाऱ्या लहान मुलांमध्ये एका नव्या आजाराची लक्षणे आढळत आहे. यावर नीति आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के.पॉल यांनी सविस्तर माहिती दिली आहे. करोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांमध्ये काही नवीन लक्षणे आढळत आहे. तसेच बऱ्याच करोनामुक्त लहान मुलांना २ ते ६ आठवड्यांच्या कालावधीत ताप, त्वचेवर खाज येणे, डोळे लाल होणे, जुलाब, उलट्या आणि श्वास घेण्यास त्रास होणे यांसारखी लक्षणे दिसून आली.
तसेच अशा बाधित मुलांना करोनाचा संसर्ग आढळून आला नाही, परंतु त्यांच्या आढळलेली ही लक्षणे अगदी करोनाप्रमाणेच आहेत. अशा लक्षणांना Multi System Inflammatory Syndrome असे म्हटले जाते . त्यामुळे करोनामुक्त होणाऱ्या लहान मुलांची २ ते ६ आठवडे अधिक काळजी घेणे गरजेचे आहे.
तसेच एकूण करोनाबाधित लहान मुलांपैकी केवळ 2 टक्के मुलांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासत आहे. या मुलांमध्ये काही लक्षणं प्रामुख्याने या ला मिळत आहेत, ती म्हणजे, ताप, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास. या लक्षणांवर उपचार केले जात आहेत, असंही डॉ. पॉल यांनी सांगितले.