मुंबई – अल्पावधीतच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अजोड कलागुणांच्या जोरावर एक वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अभिनेता ‘सुशांत सिंह राजपूत’ने आपला जीवनप्रवास थांबवला. मुंबईतील आपल्या निवासस्थानी त्याने गळफास घेत आत्महत्या केली. सुशांतची ही अकाली एक्झिट सर्वांच्याच जीवाला घोर लावणारी ठरली असून सुशांत आपल्यातून निघून गेला आहे हे सत्य पचवणं जड जातंय.
दरम्यान, सुशांतच्या निधनानंतर त्याच्या डेथ बॉडीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या या फोटोवर कलाकारांनी आणि त्याच्या चाहत्या वर्गाने विरोध दर्शवला आहे. तसेच, यावर महाराष्ट्र सायबर सेलने विरोध दर्शवला आहे. हे फोटो कुठेही व्हायरल कराल तर कायदेशीर कारवाई करू असा इशाला त्यांनी दिला आहे.
A disturbing trend has been observed on Social Media platforms by Maharashtra Cyber that pictures of deceased actor Shri. Sushant Singh Rajput are being circulated, which are disturbing and in bad taste. (1/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) June 14, 2020
महाराष्ट्र सायबर सेलने ट्विटमध्ये म्हटलंय, ‘सोशल मीडियावर एक चिंताजनक ट्रेंड होतोय. अभिनेता सुशांत सिंग राजपूतने आत्महत्या केलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत. असे फोटो पसरवणं हे कायद्याला धरून नाही. न्यायालयाच्या आदेशाच्या विरोधात आहे. जर कुणी असे फोटो शेअर केले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.’
It is emphasised that circulation of such pictures is against legal guidelines and court directions, and are liable to invite legal action. ⁰(2/n)
— Maharashtra Cyber (@MahaCyber1) June 14, 2020