सावधान! तुम्हालाही आलीये करोनाच्या चमत्कारी उपचारराची लिंक? तर ही बातमी वाचाच…

मुंबई – लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी  विविध गुन्हे  देशभरात घडलेले दिसून आले.  लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारीमध्ये वाढ होऊन  देशभरात सोशल मीडियासह  व्हाटसअप मेसेजद्वारे लोकांना   मोबाईल रिचार्ज ऑनलाईन करण्यासाठी, किंवा कोणत्याही वेब सीरिजचे सबस्क्रिप्शन स्वस्तात आहे ,खालील लिंकवर क्लिक करा असा मजकूर पाठवून फसवणूक केल्याचे प्रकार देशभरात  घडल्याचे दिसून आले आहे. मात्र आता सायबर गुन्हेगारांनी लोकांना फसविण्याची नवीन  युक्ती शोधून काढली आहे. 

 

मात्र यावर केंद्र सरकारकडून सायबर दोस्तच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती देण्यात आली असून कठोर पावले उचलण्यात आली आहे.  यासंदर्भात उदाहरण देताना सरकरने सायबर दोस्तच्या ट्विटर अकाऊंटवरुन माहिती दिली आहे की, “कोव्हिड-१९ चं कारण देत चमत्कारी उपचार, हर्बल उपचार तसेच  करून लसीकरणाबाबत आणि तातडीने तपासणीच्या नावाखाली ग्राहाकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात. आरोग्य विषयक सल्ले किंवा आधी तातडीने पैसे देण्याची मागणी या लोकांकडून केली जाते. अशाप्रकारच्या संशयित कॉल्स, ईमेल्स आणि टेक्सट मेसेजला उत्तर देऊ नका सावधान राहा ,” असं सायबर दोस्तने म्हटलं आहे. 

 

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.