नवी दिल्ली : देशात करोनाच्या नव्या व्हेरियंटचा वेगाने प्रसार होत असल्याचे समोर येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं ही नव्या व्हेरियंट बाबत धोक्याचा इशारा दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांकडून गर्दीच्या आणि सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. देशात 2112 नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून सात रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. काल देशात 2119 नवीन करोना रुग्णांची नोंद आणि 10 रुग्णांचा मृत्यू झाला होता.
करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे तीन नवीन सबव्हेरियंट आढळून आले आहेत. BF.7, XBB आणि BA.5.1.7 हे नवीन व्हेरियंट आढळले आहेत. करोनाच्या ओमायक्रॉन प्रकाराचे हे तीन नव व्हेरियंट ओमायक्रॉनहून अधिक संसर्गजन्य असल्याचा धोका शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि नवीन व्हेरियंटविरुद्ध लढण्यासाठी सरकारही गंभीर झाले आहे.
Single-day rise of 2,112 new infections pushes India's COVID-19 tally of cases to 4,46,40,748, death toll climbs to 5,28,957: Govt
— Press Trust of India (@PTI_News) October 22, 2022
मंगळवारी झालेल्या करोना आढावा बैठकीत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोविड चाचण्यावर भर देण्यास सांगितलं आहे. मागील 24 तासात म्हणजेच शुक्रवारी दिवसभरात देशात दोन हजारांहून अधिक नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. आतापर्यंत देशातील एकूण करोना बळींची संख्या 5 लाख 28 हजार 957 वर पोहोचली.
देशातील करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 24 हजारांवर आहे. सध्या देशात 24,043 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 3 हजार 102 रुग्ण करोना संसर्गातून बरे झाले आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे. देशात 219 कोटीहून अधिक करोना प्रतिबंधात्मक लसी देण्यात आल्या आहेत. त्यामुळे करोना संसर्गाचा वेग कमी करण्यात मदत झाली आहे.