सावधान ! इंटरनेट ब्रॉडबँड कंपनीकडून होऊ शकते तुमची फसवणूक 

पुणे: ऑनलाइनच्या जगात विश्वासघात होण्याचे प्रमाण जास्त वाढले आहे. माणसाच्या आयुष्यात सध्या इंटरनेट मुख्य मूलभूत गरज बनले आहे. अनेक जणांचे पोट सध्या इंटरनेटवर भरते. त्यामुळे फसवणुकीचे प्रमाण सुद्धा वाढले असून  ग्राहकांनी सतर्क असण्याची आवश्यकता आहे.

इंटरनेट ब्रॉडबँड कंपन्यांकडून मनमानी कारभार होत असल्याचे प्रकरणे सतत होत असतात. असाच प्रकार पुण्यात घडला आहे. यु ब्रॉडबँड कंपनीने ब्रॉडबँड ग्राहकाला फसवण्याचा प्रकार समोर आला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

ग्राहकाने सदर कंपनीचे ब्रॉडबँड कनेक्शन घेतले होते. मात्र पूर्ण पैसे भरून सुद्धा इंटरनेट न देणे, फोनवर प्रतिसाद न देणे, हे प्रकार घडू लागले. 31 ऑगस्ट पर्यंत तब्बल १२ ते १५ दिवस इंटरनेट बंद असल्याने ग्राहकाचे मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे सांगितले.  त्यामुळे इतर इंटरनेट प्रेमींची फसवणूक होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याची गरज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)