सातारा (प्रतिनिधी) – जिल्ह्यात काल (शनिवार, दि. 4) रात्री 12 वाजेपर्यंत जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार, आणखी 540 नागरिक करोनाबाधित झाले असून, गेल्या 24 तासांमध्ये एका बाधिताचा मृत्यू झाला.
जिल्ह्यातील विविध रुग्णालये, करोना केअर सेंटर व डीसीएचसीमध्ये उपचार घेतलेल्या 67 रुग्णांना रविवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची तालुकानिहाय संख्या आणि त्यापुढे कंसात आजअखेर बाधित रुग्णांची एकूण संख्या पुढीलप्रमाणे – फलटण 118 (35372), सातारा 110 (49778), खटाव 67 (24560), कोरेगाव 57 (21268), कराड 50 (38179), माण 43 (17087), जावळी 28 (9861), वाई 27 (15470), खंडाळा 22 (13902), पाटण 7 (9989), महाबळेश्वर 3 (4595) व इतर 8 (1937), असे आजपर्यंत एकूण दोन लाख 41 हजार 998 करोनाबाधित असून, जिल्ह्यात एकूण सहा हजार 60 करोनाबळी झाले आहेत.