अन् रिया चक्रवर्ती म्हणाली,”मर्द बनो “

मुंबई – अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सतत चर्चेत असते. सुशांत प्रकरणी पुढे आलेल्या ड्रग्ज प्रकरणात रियाचे नाव समोर आले होते. यानंतर तिला अटकही करण्यात आली होती. सध्या रिया जामिनावर बाहेर आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

या सर्व प्रकरणावेळी सुशांतच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर रियाच्या विरोधात रान पेटवले होते. त्यामुळे आता रिया सोशल मीडियापासून दूर गेली आहे. सोशल मीडियावर रिया कुठलीही प्रतिक्रिया देत नाही किंवा मत ठेवत नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Voompla (@voompla)

मात्र, नुकतंच सोशल मीडियावर रियाचा  फोटो व्हायरल झाला आहे. रियाने  घातलेल्या टी शर्टचा हा फोटो सध्या चांगलाच चर्चेत आहे. या ती शर्टवर मर्द बनो अर्थातच इंग्लिशमध्ये मन अप असा संदेश लिहिला गेला आहे.  सध्या तिच्या या लूकची चर्चा सोशलवर  चांगलीच रंगली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

यापूर्वीही सोशल मीडियावर रियाचा पार्टी करतानाचा फोटो व्हायरल झाला आहे. रियाने राजीव लक्ष्मणसोबत पार्टी केली आहे. राजीव लक्ष्मणने मित्रांसाठी पार्टीचे आयोजन केले होते. त्या पार्टीत रिया देखील एन्जॉय करताना दिसून आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rhea Chakraborty (@rhea_chakraborty)

दरम्यान, अनेक संकटांचा सामना करणारी रिया आता पुन्हा नव्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 2021 मध्य़े रियाचा ‘चेहरे’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रिया अमिताभ बच्चन आणि इम्रान हाश्मीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. रिया आता मागचं सर्व काही विसरून तिच्या जीवनाची नव्याने सुरूवात करणार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.