मुंबई – भारतीय संघाचा माजी कर्णधार बेस्ट फिनिशर व चेन्नई सुपर किंग्जचा प्रमुख खेळाडू महेंद्रसिंह धोनी याला बीसीसीआयने इशारा दिला आहे.
दक्षिण आफ्रिका लीगमध्ये धोनी मेंटॉरच्या भूमीकेत दिसणार होता. मात्र, त्यापूर्वी त्याला आयपीएल स्पर्धेतूनही निवृत्ती जाहिर करावी लागेल, अन्यथा त्याला मेंटॉर म्हणून काम करता येणार नाही, असा इशारा बीसीसीआयने दिला आहे.
भारताच्या कोणत्याही क्रिकेटपटूला निवृत्ती घेतल्याशिवाय परदेशातील क्रिकेट लीगशी कोणताही करार करता येत नाही. अन्य देशात होत असलेल्या विविध टी-20 लीगशी करार करण्यापूर्वी बीसीसीआयचे जे काही नियम आहेत, त्याची पूर्तता प्रत्येक खेळाडूला करावी लागते, त्याला धोनीही अपवाद नाही, असेही बीसीसीआयने म्हटले आहे.