Tim David Fined For Controversial Gesture : आयपीएल २०२६ (IPL 2026) मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध मिळवलेल्या ऐतिहासिक विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा (RCB) खेळाडू टिम डेव्हिड याला त्याचे वर्तन महागात पडले आहे. सामन्यात विजय मिळाल्यानंतर टिम डेव्हिडने केलेल्या एका वादग्रस्त इशाऱ्याची दखल घेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्यावर कडक कारवाई केली आहे. थरारक विजय आणि वादग्रस्त इशारा – रविवारी १० मे रोजी रायपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात आरसीबीने शेवटच्या चेंडूवर मुंबई इंडियन्सचा २ गड्यांनी पराभव केला. शेवटच्या ६ चेंडूत १५ धावांची गरज असताना भुवनेश्वर कुमारचा षटकार आणि रासिक सलाम डारच्या दोन धावांमुळे आरसीबीने रोमहर्षक विजय मिळवला. या विजयामुळे संपूर्ण डगआऊटमध्ये उत्साहाचे वातावरण होते, मात्र या जल्लोषात टिम डेव्हिडने सर्व मर्यादा ओलांडल्या. त्याने केलेला एक अश्लील इशारा कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला. All were busy with Virat Kohli’s celebration, see how Tim David celebrated 😂🔥 pic.twitter.com/0ApBaRNKNJ — Middle Stump Cricket (@MiddleCricket) May 11, 2026 बीसीसीआयची मोठी कारवाई – Tim David to face a 30% match fee fine along with 2 demerit points for an offensive gesture during the game 🚨 pic.twitter.com/ExlmL8frSo — CRICKETNMORE (@cricketnmore) May 11, 2026 बीसीसीआयने टिम डेव्हिडला आयपीएलच्या आचारसंहितेचा (Code of Conduct) भंग केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. या गुन्ह्यासाठी त्याच्यावर मॅच फीच्या ३० टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्याच्या शिस्तविषयक रेकॉर्डमध्ये २ डिमेरिट पॉइंट्स देखील जोडण्यात आले आहेत. भरमसाठ दंड आणि डिमेरिट पॉइंट्समुळे डेव्हिडच्या अडचणीत वाढ झाली आहे. हेही वाचा – Badrinath Controversial Comment : ‘त्याला तिथेच मरू द्या…’; क्रुणाल पंड्याबाबत माजी खेळाडूचे संतापजनक विधान, सोशल मीडियावर तीव्र संताप! मुंबईचे आव्हान संपुष्टात – या विजयामुळे आरसीबीने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे, तर मुंबई इंडियन्सचे या हंगामातील प्लेऑफचे स्वप्न भंगले आहे. मुंबईसाठी हा हंगाम अत्यंत निराशाजनक ठरला असून दिग्गज खेळाडूंना सूर गवसलेला नाही. आता टिम डेव्हिडवरील या कारवाईमुळे आरसीबीच्या विजयाला शिस्तीच्या उल्लंघनाचे गालबोट लागले आहे.