मुंबई – बीसीसीआयने अखेर मोठ्या कालावधीनंतर पुढील वर्षापासून महिलांची परिपूर्ण आयपीएल स्पर्धा घेण्याचे निश्चित केले आहे. ( BCCI set to launch five-team women’s IPL in March 2023) ही स्पर्धा पहिल्या मोसमात पुढील वर्षी मार्चमध्ये होण्याचे संकेत मिळाले असून, त्यात पाच संघ सहभागी होतील असेही सांगण्यात येत आहे.
महिलांची परिपूर्ण आयपीएल स्पर्धा होणार असे आश्वासन बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी आपल्या कार्यकाळात दिले होते. आता ते या पदावरून पायउतार झालेले असले तरीही येत्या आठवड्यात या पदाची जबाबदारी घेणारे माजी कसोटी क्रिकेटपटू रॉजर बिन्नी हे स्वप्न पूर्णत्वाला नेणार आहेत. या स्पर्धेत 22 सामने खेळवले जाणार असून, एका संघात 18 खेळाडू असतील. त्यापैकी 6 परदेशी असतील. अंतिम अकरा खेळाडूंमध्ये जास्तीत जास्त पाच परदेशी खेळाडू खेळू शकतील, तर त्यापैकी चार खेळाडू आयसीसीच्या पूर्ण सदस्य देशांचे असतील. एक खेळाडू सहयोगी देशाचा असेल.
बीसीसीआय महिलांच्या आयपीएलच्या संघ विक्रीसाठी दोन पर्यायांवर सध्या विचार करत आहे. त्यानुसार पहिल्या पर्यायांत संघांची विभागणी होणार असून त्यात उत्तर विभाग (धर्मशाला/जम्मू), दक्षिण विभाग (कोची/विशाखापट्टणम), मध्य विभाग (इंदूर/नागपूर/रायपूर), पूर्व विभाग (रांची/कटक), ईशान्य विभाग (गुवाहाटी) आणि पश्चिम विभाग (पुणे/राजकोट) यांचा समावेश आहे. दुसरा पर्याय संघांची विक्री करताना कोणताही होम बेस न ठेवता प्राधान्याने संघ विकले जातील. स्पर्धेतील सामने अहमदाबाद, बंगळुरू, चेन्नई, दिल्ली, कोलकाता व मुंबईत होतील. प्रत्येक संघ साखळीत एकमेकांशी खेळतील. याबाबत बैठकीत बीसीसीआय अधिकृत घोषणा करणार आहे.
#T20WorldCup : फिलिप्सच्या शतकानंतर बोल्टची घातक गोलंदाजी, न्यूझीलंडचा श्रीलंकेवर मोठा विजय
संघांची निवड लवकरच
महिलांच्या आयपीएल स्पर्धेत जे पाच संघ खेळतील त्यांची निवड, नावे, त्यांची विक्री कोणत्या रकमेला करायची तसेच खेळाडूंचा लिलाव व त्यांची बेसप्राइज याबाबत महिलांची आयपीएल समिती स्थापन करून निर्णय घेतले जाणार आहेत, असेही संकेत बीसीसीआयने दिले आहेत.