सध्याच्या परिस्थितीला बीसीसीआय जबाबदार – सचिन तेंडुलकर

मुंबई – हितसंबंधाच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना सचिन तेंडुलकरने भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरच (बीसीसीआय) ताशेरे ओढले असून सध्याच्या परिस्थितीला “बीसीसीआय’ जबाबदार असल्याचा आरोप सचिनने खुलासा पत्रात केला आहे. तेंडुलकर क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांसोबतच मुंबई इंडियन्सचा “आयकॉन’ आहे. त्यामुळे तो दुहेरी भूमिका पार पाडत असल्याचा आरोप त्याच्यावर करत त्याच्या विरोधात याचीका दाखल केली गेली होती त्या प्रकरणी सचिनने बीसीसीआयचे लोकपाल डी. के. जैन यांना 13 मुद्यांमध्ये आपले उत्तर दिले आहे.

आपल्या उत्तरामध्ये सचिनने प्रशासकीय समिती (सीओए)चे प्रमुख विनोद राय व मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना बोलावून प्रकरणातील आपली स्थिती स्पष्ट करण्यात यावी, अशी विनंती करण्यात आली आहे. सीएसीचे तीन सदस्य तेंडुलकर, सौरव गांगुली व व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांना बोर्डाचे लोकपाल व नैतिक अधिकारी डी. के. जैन यांनी नोटीस पाठवली होती; पण तिघांनीही आपल्यावरील आरोप मान्य केले नाहीत.

तेंडुलकर व लक्ष्मण यांना मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे सदस्य संजीव गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनंतर नोटीस पाठविण्यात आल्या होत्या. तेंडुलकरला जोहरींच्या पत्रावर आक्षेप आहे जे त्यांनी तक्रारदार गुप्ता यांना लिहिले होते. तेंडुलकरने आपल्या दहाव्या, अकराव्या व 12 व्या पॉईंटमध्ये सीएसीचे सदस्य बनविण्याचा निर्णय हा बीसीसीआयचा होता व आता तेच हितांबाबत बोलत आहेत. सचीनला 2013 साली मुंबई इंडियन्सचा आयकॉन बनविण्यात आले होते तर, सीएसीची स्थापना 2015 साली झाली होती.

सीईओ व सीओए यांनी कधीही सीएसीमध्ये आपल्या नियुक्तीबाबत असलेल्या अटी कधीही सांगितल्या नाहीत, असे आरोप लक्ष्मणप्रमाणे तेंडुलकरने देखील केले आहेत. सचिनने सीएसीला आपल्या भूमिकेबाबत बीसीसीआयकडे स्पष्टीकरण मागितले होते, मात्र, आजपर्यंत त्याचे उत्तर मिळाले नाही. सीएसी केवळ सल्लागाराची भूमिका पार पाडू शकतात. हे बीसीसीआयला माहीत आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सचा “आयकॉन’ म्हणून राहिल्यास हितांचा कोणताच गैरवापर होत नाही, असे तेंडुलकरने उत्तरात म्हटले आहे.

त्याच बरोबर 19 वर्षांखालील राष्ट्रीय संघाच्या निवड समितीच्या निवड प्रक्रियेतून आपण का बाहेर पडलो याचा उल्लेखदेखील सचिनने केला आहे. कारण, 19 वर्षांखालील संघाच्या निवडीसाठी त्याचा मुलगा अर्जुन स्थान मिळवण्यासाठी शर्यतीत होता. या प्रकरणात जर त्याची निवड झाली असती तर त्यावेळी हितांच्या गैरवापराबाबत चर्चा झाली असती आणि मी आपण बीसीसीआयला तशी माहिती दिली होती, असेही तेंडुलकरने उत्तरात नमूद केले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.