Sourav Ganguly : भारतीय संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह त्याच्या पाठीच्या दुखापतीमुळे टी-२० विश्वचषकातून बाहेर पडलाआहे, अशा बातम्या मोठ्या प्रमाणात प्रसारमाध्यमांकडून समोर आल्या. यानंतर मात्र क्रिकेटच्या चाहत्यांपासून माजी खेळाडूंपर्यंत त्याचीच चर्चा रंगली होती. मात्र आता बुमराहच्या दुखापतीबाबत बीसीसीआय ( BCCI ) अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी एक मोठे विधान केले आहे. बुमराह अजूनही विश्वचषकातून बाहेर गेलेला नाही. असे गांगुलींनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे आता क्रिकेट वर्तुळात आणखीच चर्चा वाढणार हे नक्की आहे.
टी-२० विश्वचषक २०२२ ला १६ ऑक्टोबर पासून ऑस्ट्रेलियात सुरुवात होणार आहे. त्यापूर्वीच बुमराहाचे या स्पर्धेत न खेळणे भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण मागील बऱ्याच काळापासून बुमराह त्याच्या दुखापतीच्या समस्येमुळे संघाबाहेर राहिला आहे. आशिया चषकात त्याला दुखापतीमुळे संघाबाहेर ठेवण्यात आले होते. त्याच्या गैरहजेरीत भारतीय गोलंदाजी अत्यंत सुमार दर्जाची पाहायला मिळाली होती. त्यामुळे सर्वच भारतीय क्रिकेट चाहत्यांना बुमराहने विश्वचषकात खेळावे अशीच अपेक्षा आहे. ( BCCI president Sourav Ganguly’s statement regarding Jasprit Bumrah’s injury T20 WorldCup 2022 )
बीसीसीआय ( BCCI ) अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly ) यांनी Ritzsport शी बोलताना म्हटले आहे की, “बुमराह अजूनही टी-20 विश्वचषकातून बाहेर पडलेला नाही, अजून काही वेळ शिल्लक आहे. आम्ही जसप्रीत बुमराहवर लक्ष ठेवत आहोत”, तसे पहिले तर सर्वच संघांना आयसीसीच्या नियमानुसार १५ ऑक्टोबर पर्यंत घोषित केलेल्या संघात बदल करून पुन्हा नवीन संघ जाहीर करण्याची मुदत असते. त्यामुळे बुमराह खेळणार की नाही याबाबत अजूनही बीसीसीआय ( BCCI ) कडून स्पष्टता देण्यात आलेली नाही.
.@SGanguly99 🗣️ “World Cup is still quite some time away. Let’s not jump the gun.”#JaspritBumrah
— RevSportz (@RevSportz) September 30, 2022
टी-२० वर्ल्डपकमधील भारतीय संघाचे वेळापत्रक
भारत विरुद्ध पाकिस्तान, २३ ऑक्टोबर- मेलबर्न
भारत विरुद्ध पात्रता फेरीतील संघ, २७ ऑक्टोबर, सिडनी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, ३० ऑक्टोबर, पर्थ
भारत विरुद्ध बांगलादेश, २ नोव्हेंबर, एडिलेड ओव्हल.