नवी दिल्ली – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष व माजी कर्णधार सौरव गांगुली यांचा करोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. खबरदारी म्हणून गांगुली यांनी करोना चाचणी केली होती.
सौरव गांगुली यांचा मोठा भाऊ स्नेहाशीष गांगुलीला करोनाची बाधा झाल्याने एकाच घरात राहात असल्यामुळे घरातच विलगीकरणात जावे लागले होते. शनिवारी गांगुलीची चाचणी करण्यात आली होती. त्याचा अहवाल आला असून गांगुली निगेटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले आहे.