मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून टीम इंडियाचे फलंदाजाचीच्या कामगिरीत घसरण पाहायला मिळत आहे. त्यामुळे बीसीसीआय मोठ्या प्रमाणात चिंतेत आहे. यामुळे आता बीसीसीआयने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीत काही मोठे निर्णय घेतले आहेत. या नियमांमुळे खेळाडूंना मोठा फटका बसणार आहे. आता हे नियम कोणते आहेत? त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया…
खेळाडूंच्या कुटुंबियांसाठी नियम
बीसीसीआयने खेळाडू आणि कुटुंबांसाठी नवे नियम जारी केले आहेत. नव्या नियमांनुसार, खेळाडूंच्या पत्नी किंवा कुटुंबीयांना संपूर्ण स्पर्धेसाठी खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी आता नसणार आहे. त्यांना फक्त दोन आठवडे खेळाडूंसोबत राहता येणार आहे. जेणेकरून खेळाडू आपल्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करतील म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
गंभीरवरही नियम लादला
जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवस किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालत असेल, तर कुटुंबीयांना फक्त 14 दिवस खेळाडूंसोबत राहता येईल. याशिवाय, जर खेळाडूंच्या सामानाचे वजन 150 किलोपेक्षा जास्त असेल, तर बीसीसीआय त्यांना अधिक पैसे देणार नाही. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्यासाठीदेखील हा नियम लागू होणार आहे.
पर्सनल मॅनेजरला नो एन्ट्री
गंभीरच्या पर्सनल मॅनेजरला टीम बस किंवा व्हीआयपी बॉक्समध्ये येण्याची परवानगी नसणार आहे. पर्सनल मॅनेजरलाही वेगळ्या हॉटेलमध्ये राहावं लागणार आहे. तसेच जर स्पर्धा किंवा मालिका 45 दिवसांपेक्षा कमी दिवसांची असेल तर कुटुंबीय फक्त 7 दिवस सोबत राहू शकतात.
WAG ची एन्ट्री बॅन
क्रिकेटमध्ये “WAG” हा शब्द वाइव्ज अँड गर्लफ्रेंड्ससाठी वापरला जातो. हा शब्द क्रिकेटपटूंच्या पत्नी आणि गर्लफ्रेंड्सला संबंधित आहे, जे अनेक वेळा सामन्यांना किंवा इतर इव्हेंट्सना त्यांच्या पत्नी किंवा गर्लफ्रेंडसोबत उपस्थित असतात. त्यांना आता मैदानावर बॅन करण्यात येणार आहे.
प्रवासावर बंधन
प्रत्येक खेळाडूला टीम बसने प्रवास करावा लागेल, वेगळा प्रवास करण्याची परवानगी खेळाडूला नसणार आहे.