नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) यंदाच्या मोसमासाठी क्रिकेटपटूंचे करार जाहीर केले असून कर्णधार विराट कोहलीच्या करार रकमेत वाढ करण्यात आली आहे, तर माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला करार यादीतून वगळले आहे. लोकेश राहुलने सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन केल्यामुळे त्याला ‘ब’ श्रेणीतून ‘अ’ श्रेणीत स्थान मिळाले आहे.
नवोदित खेळाडू नवदीप सैनी, मयंक अगरवाल, श्रेयस अय्यर, वाॅशिग्टंन सुंदर, आणि दीपक चहर यांचा करारामध्ये समावेश करण्यात आला आहे.
The BCCI announces the Annual Player Contracts for Team India (Senior Men) for the period from October 2019 to September 2020.
Saini, Mayank, Shreyas, Washington and Deepak Chahar get annual player contracts.
More details here – https://t.co/84iIn1vs9B #TeamIndia pic.twitter.com/S6ZPq7FBt1
— BCCI (@BCCI) January 16, 2020
आॅक्टोबर २०१९ ते सप्टेंबर २०२० या वर्षभराच्या कालावधीसाठी हा करार आहे. यामध्ये कामगिरीनुसार अ+ श्रेणी, अ श्रेणी, ब श्रेणी आणि क श्रेणीत खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. अ+ श्रेणीतील खेळाडूंना ७ कोटी, अ श्रेणीतील खेळाडूंना ५ कोटी, ब श्रेणीतील खेळाडूंना ३ कोटी तर क श्रेणीतील खेळाडूंना १ कोटी मानधन दिले जाते.
करारबध्द खेळाडू खालीलप्रमाणे :
अ+ श्रेणी : विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह.
अ श्रेणी : रवीचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अंजिक्य रहाणे, लोकेश राहुल, शिखर धवन, महंमद शम्मी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, रिषभ पंत.
ब श्रेणी : वृध्दिमान साहा, उमेश यादव, युजर्वेंद चहल, हार्दिंक पांड्या, मयंक अगरवाल.
क श्रेणी : केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनीष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वाॅशिंग्टन सुंदर.