नवी दिल्ली : महेंद्रसिंग धोनी ,विराट कोहली यांना एकाच संघातून खेळताना आपण पाहिले आहे, पण आता हेच स्टार खेळाडू इंडियन प्रीमिअर लीगच्या एका प्रदर्शनीय लढतीत एकाच संघातून खेळणार आहेत.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंडियन प्रीमियर लीग समिती (आयपीएल) यंदाच्या मोसमात प्रत्यक्ष स्पर्धेपूर्वी एक प्रदर्शनीय सामना आयोजित करणार आहे. आयपीएलचा सलामीचा सामना येत्या २९ मार्च रोजी खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ८ संघातील स्टार खेळाडू एकाच सामन्यात सहभागी होतील.
या सामन्यासाठी दोन संघ तयार करण्यात येणार असून उत्तर भारत आणि पूर्व भारत अशी संघाची नावे निश्चित करण्यात आली आहेत.