मुंबई – हर्षा भोगले आणि रवींद्र जडेजा यांच्यावर अत्यंत विक्षिप्त शब्दांत टीका करणाऱ्या माजी कसोटीपटू संजय मांजरेकर यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आपल्या करारबद्ध समालोचकांच्या पथकातून गच्छंती केली आहे. त्यानंतर संजय मांजरेकर यांनी आपल्या अधिकृत टविटर अकाउंटवर याबाबत पहिल्यादांच प्रतिक्रिया दिली आहे.
I have always considered commentary as a great privilege, but never an entitlement. It is up to my employers whether they choose to have me or not & I will always respect that. Maybe BCCI has not been happy with my performance of late. I accept that as a professional.
— Sanjay Manjrekar (@sanjaymanjrekar) March 15, 2020
“बीसीसीआयला माझे समालोचन पसंत नसेल त्यामुळेच त्यांनी मला वगळले. त्यांचा निर्णय मी मान्य करतो व त्यांच्या मताचा आदरही करतो”, असे संजय मांजरेकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, समालोचकांच्या यादीत लिटील मास्टर सुनील गावसकर, लक्ष्मण शिवरामकृष्णन व मुरली कार्तिक यांचा समावेश असून त्यातून मांजरेकरांना बाहेर काढण्यात आले आहे. खेळाडूंच्या खेळाचे समीक्षण जरूर करावे. मात्र, त्यांच्यावर अत्यंत टोकाची टीका केली जाऊ नये हे साधे संकेतही मांजरेकर यांनी पाळले नाहीत, त्यामुळेच त्यांना बाहेर ठेवण्यात आले असल्याचे मंडळाच्या सूत्रांनी सांगितले आहे.