मुंबई : बीसीसीआयने अंडर-19 आशिया कप 2024 साठी टीम इंडियाची घोषणा केली आहे. ही स्पर्धा UAE मध्ये पार पडणार आहे. ही स्पर्धा 50 षटकांच्या फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम अ आणि टीम ब असे दोन ग्रुप असणार आहेत. टीम अ संघात पाकिस्तान, जपान आणि यूएई या संघांचा समावेश आहे तर टीम बी मध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ आणि श्रीलंका या संघाचा समावेश असणार आहे.
‘या’ दिवशी होणार पाकिस्तान बरोबर सामना
या स्पर्धेपूर्वी भारतीय संघ 26 नोव्हेंबरला शारजाहमध्ये बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळणार आहे. यानंतर 30 नोव्हेंबर रोजी दुबईमध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना रंगणार आहे. तसेच भारताचे पुढचे जपान आणि UAE विरुद्ध होणार आहे.
अंडर-19 आशिया कपसाठी भारतीय संघ
आयुष म्हात्रे, वैभव सूर्यवंशी, सी आंद्रे सिद्धार्थ, मोहम्मद अमान (कर्णधार), किरण चोरमले (उपकर्णधार), प्रणव पंत, हरवंशसिंग पंगालिया (यष्टीरक्षक), अनुराग कवडे (यष्टीरक्षक), हार्दिक राज, मोहम्मद अनस, केपी कार्तिकेय, समर्थ नागराज, युधाजित गुहा, चेतन शर्मा, निखिल कुमार.
राखीव : साहिल पारख, नमन पुष्पक, अनमोलजीत सिंग, प्रणव राघवेंद्र, डी दीपेश.
अंडर-19 आशिया कप स्पर्धेतील भारताचे वेळापत्रक
भारत अंडर-19 विरुद्ध पाकिस्तान अंडर-19 : 30 नोव्हेंबर, दुबई (सकाळी 10:30)
भारत अंडर-19 विरुद्ध जपान अंडर-19 : 2 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
भारत अंडर-19 वि UAE अंडर-19: 4 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
पहिला उपांत्य सामना : 6 डिसेंबर, दुबई (भारतीय वेळेनुसार सकाळी 10:30)
दुसरा उपांत्य सामना : 6 डिसेंबर, शारजाह (सकाळी 10:30)
अंतिम सामना : 8 डिसेंबर, दुबई (सकाळी 10:30)