IND vs SA ODI – साऊथ आफ्रिका क्रिकेट संघ सध्या भारत दौऱ्यावर आलेला आहे. दोन्ही संघांमध्ये ३ सामान्यांची टी-२० मालिका खेळली जात आहे. यानंतर उभय संघांमध्ये एकदिवसीय मालिकाही खेळली जाणार आहे. या एकदिवसीय मालिकेसाठी बीसीसीआयने रविवारी ( आज ) भारतीय संघाची घोषणा केली आहे. या संघामध्ये अनेक नवख्या खेळाडूंना संधी देण्यात आलेली आहे. आगामी काळात होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी संघातील वरिष्ठ व प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्यात आलेली आहे.
संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक तसेच गोलंदाजांमध्ये हर्षल पटेल, अर्शदिप सिंगसह संघातील इतर काही खेळाडूंना या एकदिवसीय मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. तसे पहिले तर ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात खेळणाऱ्या सर्वच खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे.
साऊथ आफ्रिका विरुद्धच्या या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची कमान शिखर धवनच्या खांद्यावर सोपवण्यात आलेली आहे. तर उपकर्णधार पदाची जबाबदारी श्रेयश अय्यर याच्याकडे देण्यात आली आहे. भारतीय संघात खेळताना पहिल्यांदाच अय्यरकडे अशा प्रकारची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. ४ ऑक्टोबरला शेवटचा टी-२० सामना खेळल्यानंतर भारतीय संघ ६ ऑक्टोबर पासून एकदिवसीय मालिका खेळणार आहे. ( BCCI has announced the Indian squad for the ODI series against South Africa )
Shikhar Dhawan (C), Shreyas Iyer (VC), Ruturaj Gaikwad, Shubhman Gill, Rajat Patidar, Rahul Tripathi, Ishan Kishan (WK), Sanju Samson (WK), Shahbaz Ahmed, Shardul Thakur, Kuldeep Yadav, Ravi Bishnoi, Mukesh Kumar, Avesh Khan, Mohd. Siraj, Deepak Chahar.#TeamIndia | #INDvSA
— BCCI (@BCCI) October 2, 2022
भारत विरुद्ध दक्षिण अफ्रीका एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना – ६ ऑक्टोबर, लखनऊ
दुसरा एकदिवसीय सामना – ९ ऑक्टोबर, रांची
तिसरा एकदिवसीय सामना – ११ ऑक्टोबर, दिल्ली