लंडन – इंग्लंडविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यापूर्वी नियमित कर्णधार रोहित शर्मा करोनाबाधित आढळला. तो व माजी कर्णधार विराट कोहली यांनी इंग्लंडमध्ये दाखल झाल्यावर कोणतीही काळजी घेतली नाही व मनमुराज शॉपिंग केले होते. अनोळखी व्यक्तींसह सेल्फी घेणे तसेच शॉपिंगसाठी विविध गर्दीच्या टीकाणी फिरणे यामुळेच रोहितला करोनाची बाधा झाली असावी, असे सांगितले गेले.
त्यामुळे बीसीसीआयने नाराजी व्यक्त केली असून पुढील काळात खेळाडूंनी अशी कोणतीही कृती करू नये, असे आदेश दिले आहेत. रोहितला विलगीकरणार पाठवले गेले असून कोहलीची फेर चाचणी निगेटिव्ह आल्यामुळे तो या कसोटीत खेळणार आहे. मात्र, रोहितबाबत अद्याप चित्र स्पष्ट झालेले नाही.