मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आता उरले आहेत टॉप ८ सदस्य. काल संतोष चौधरी म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके दादूस यांना घराबाहेर पडावे लागले. आता या नव्या आठवड्यात कोण घराचा नवा कॅप्टन बनणार ? कोण घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेमध्ये येणार ?
आणि कोण सेफ होणार ? याची उत्सुकता आपल्या सगळ्यांना लागून राहली आहे. आज घरामध्ये रंगणार आहे “Knock Out” हे नॉमिनेशन कार्य! बघूया कोण कोणाला नॉमिनेशनमध्ये
टाकणार ? कोणता सदस्य कोणाच्या बाजूने खेळणार? Knock Out” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्य ज्या स्पर्धकाला नॉमिनेट करू इच्छितात त्या स्पर्धकाच्या नावाचे पुस्तक पटकावायचे आहे.