BBM3: मीनल आणि आदिशमध्ये वादाची ठिणगी… “मी सत्याच्या बाजूने आहे” – विशाल निकम

मुंबई  : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज मीनल आणि आदिशमध्ये जोरदार भांडण होणार आहे. टास्क दरम्यान दोघांमध्ये खटका उडाला आणि त्याचमुळे आदिश मीनलवर नाराज आहे. तर आदिशच्या बोलण्यामुळे मीनल त्याला बजावून सांगणार आहे की, “माझ्याशी नीट बोलायचं” नक्की कोणत्या टास्कमुळे यांच्यातले वाद इतक्या टोकाला गेले हे आजच्या भागामध्ये कळलेच. टास्क म्हंटल की वाद विवाद होणारच. बघूया हे भांडण विशाल सोडवू शकेल का?

विशाल आदिशला सांगणार आहे मीनलशी बोलून घे विकास पण येतो आहे. आदिशने त्यावर मीनलशी बोलण्यास साफ नकार दिला. “मी सांगितलं ना नाही बोलायच मला आता तुझ्याशी, तर नाही बोलायचे. जेव्हा मी आलो होतो तेव्हा तू मला परत पाठवलस ना”. त्यावर विशालने त्याला सांगितले तिने तुला दहा वेळा बोलावलं. मीनल म्हणाली, “ मी तुला म्हणाली, हीच वेळ आहे बोलूया.

माझ्याशी असं बोलायचे नाही. DO NOT Talk to me like that, मी व्यवस्थित बोलते आहे तुझ्याशी. तू नीट बोल मी पण नीट बोलेन”.   आदिश म्हणाला, आता नाही बोलायचे डोन्ट इन्स्टिगेट. तिला सांग ओरडा ओरड करु नकोस”. आदिशला वाटणार आहे विशाल देखील मीनलची बाजू घेतो आहे… त्यावर विशाल म्हणाला मी सत्याच्या बाजूने आहे”.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.