मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ याच्या बिग बॉस या रियालिटी शो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. या लोकप्रिय शो ची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या ‘बिग बॉस’च्या 14व्या सीझनची जोरदार तयारी सुरू झाली आहे.
वास्तविक, टीव्ही मालिकांच्या शूटिंगची घोषणा झाल्यापासून निर्मात्यांनी शोची तयारी सुरू केली आहे. नुकतंच, सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये सलमानचा अनोखा अंदाज दिसून येत आहे.
प्रेक्षकांची तुफान पसंती मिळवणारा बिग बॉस 14 (Big Boss 14) शो 3 ऑक्टोबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चौदाव्या सिझनमध्ये घरातही नवनवे बदल करण्यात आले आहेत. शो सुरू होण्याआधीच आम्ही तुम्हाला घडवणार आहोत बिग बॉसच्या घराची सफर.
मिळालेल्या माहिती नुसार, यंदाचा सीझन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यांच्या अवतीभवती फिरणार्या थीमवर असू शकतो. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.