मुंबई – बॉलिवूड अभिनेता ‘सलमान खान’ याच्या बिग बॉस या रियालिटी शो ला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळत असतो. या लोकप्रिय शो ची प्रेक्षक अगदी आतुरतेने वाट पाहत असतात. सध्या ‘बिग बॉस’च्या 14व्या सीझनची जोरदार तयारी सुरू झाली आहे. वास्तविक, टीव्ही मालिकांच्या शूटिंगची घोषणा झाल्यापासून निर्मात्यांनी शोची तयारी सुरू केली आहे. नुकतंच, सलमान खानने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली असून, यामध्ये सलमानचा अनोखा अंदाज दिसून येत आहे.
Ghar ke sab kaam karlo khatam, kyunki ab scene paltega! #BiggBoss2020 #BB14 @BeingSalmanKhan pic.twitter.com/Cpa46o6fWa
— Bigg Boss (@BiggBoss) August 15, 2020
सलमानचा मजेशीर अंदाजामधील हा फोटो बिग बॉस सीझन 14 च्या घरात यंदा काही खास आणि हटके बघायला मिळणार याची चाहूल देत आहे. फोटो मध्ये भाईजान घरातील लादी पुसताना दिसत आहे. “घर के सब काम कर लो खत्म क्योंकि अब सीन पलटेगा!” असं कॅप्शन या फोटोला देण्यात आला आहे. यापूर्वी सलमानने आपल्या पनवेल मधील फार्महाऊसवर ‘बिग बॉस 14’चा दमदार प्रोमो शूट केला होता.
Scene palatne ka waqt aa gaya hai! #BB14, jald hi sirf #Colors par.
Catch Bigg Boss before TV on @VootSelect.#BiggBoss2020 @BeingSalmanKhan pic.twitter.com/9cOS1mHO1t
— COLORS (@ColorsTV) August 11, 2020
मिळालेल्या माहिती नुसार, यंदाचा सीझन लॉकडाऊन आणि सोशल डिस्टंसिंग यांच्या अवतीभवती फिरणार्या थीमवर असू शकतो. याबाबत अद्याप कोणताही खुलासा करण्यात आलेला नाही.