पॅरिस – बायर्न म्युनिक आणि चेल्सी या संघांनी चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. म्युनिकने लाजिओला 2-1 असे पराभूत करत हरवत विक्रमी 19 व्यांदा स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मजल मारली.
संघाचा स्टार खेळाडू रॉबर्ट लेवानोव्हस्कीने 33 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या हाफमध्ये एरिक मॅकिम शोपा मटिंगने 73 व्या मिनिटाला गोल करत आघाडी वाढवली. त्यानंतर लाजिओने गोल करत लढत 2-1 अशी केली. लाजिओकडून मार्को पारोलोने 82 व्या मिनिटाला गोल केला.
अन्य लढतीत चेल्सीने एटलिको माद्रिदला 2-0 असे पराभूत करत अंतिम आठमध्ये स्थान मिळवले. चेल्सीकडून हकीम जियेचने 34 व्या मिनिटाला गोल केला. चेल्सीकडून एमर्समन पालमिएरीने दुसरा गोल केला.