भारत-इसेक्‍स तीन दिवसीय सराव सामना ; सराव सामन्यावर फलंदाजांचे वर्चस्व !

उमेश यादवला 4, तर ईशांत शर्माला 3 बळी

चेम्सफोर्ड: अपेक्षेप्रमाणेच अनिर्णितावस्थेकडे वाटचाल करणाऱ्या भारत विरुद्ध इसेक्‍स या तीन दिवसीय सराव सामन्यात फलंदाजांचेच वर्चस्व राहिले. इंग्लंडविरुद्ध आव्हानात्मक अशा कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाला सरावासाठी मिळालेला हा एकमेव सामना होता.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

याआधी भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धची टी-20 मालिका जिंकून दौऱ्याची विजयी सुरुवात केली होती. परंतु त्यानंतरच्या एकदिवसीय मालिकेत इंग्लंडने बाजी मारली. त्यामुळे दोन्ही संघांसाठी आगामी कसोटी मालिका अत्यंत प्रतिष्ठेची आहे. त्यातच इंग्लंडला गेल्या तीन कसोटी मालिकांमध्ये सपशेल अपयश आल्यामुळे त्यांना मायदेशातील या मालिकेत यश मिळविणे आवश्‍यक आहे.
हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी आणि ऋषभ पंतची फटकेबाजी यामुळे भारतीय संघाने पहिल्या डावांत सर्वबाद 395 धावांची मजल मारली.

दोन बाद 43 अशा खराब प्रारंभानंतर कर्णधार टॉम वेस्टली आणि मायकेल कायली-पेपर या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी 68 धावांची, कायली-पेपर व ऋषी पटेल यांनी चौथ्या गड्यासाठी 56 धावांची, जेम्स फॉस्टर व पॉल वॉल्टर यांनी सहाव्या गड्यासाठी 106 धावांची, तसेच पॉल वॉल्टर व ऍरॉन निज्जर यांनी आठव्या गड्यासाठी 53 धावांची भागीदारी करताना ससेक्‍सचे आव्हान कायम राखले.

तत्पूर्वी 3 बाद 44 अशा घसरगुंडीनंतर भारताने पहिल्या डावांत 395 धावांची मजल मारली होती. शिखर धवन (0), चेतेश्‍वर पुजारा (1) आणि अजिंक्‍य रहाणे (17) ही भारताची वरची फळी अपयशी ठरल्यानंतर विराट कोहली (68) आणि मुरली विजय (53) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेली 90 धावांची शानदार भागीदारी, तसेच दिनेश कार्तिक (82) आणि लोकेश राहुल (58) यांनी सहाव्या गड्यासाठी रचलेल्या 114 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

त्यातही हार्दिक पांड्या (51) आणि ऋषभ पंत (नाबाद 34) यांची फटकेबाजी आणि अखेरच्या विकेटसाठी त्यांनी केलेल्या भागीदारीमुळे भारताने 395 धावांपर्यंत मजल मारली. ससेक्‍सकडून पॉल वॉल्टरने 113 धावांत 4 बळी घेत सर्वोत्तम कामगिरी केली. मॅट कोल्सने 31 धावांत 2 बळी घेतले. तर मॅथ्यू क्‍विन, ऍरॉन बीअर्ड, मॅट डिक्‍सन व ऍरॉन निज्जर यांनी प्रत्येकी एक बळी घेत त्यांना सुरेख साथ दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)