भोपाळ | फलंदाजाची क्षेत्ररक्षकाला मारहाण, क्षेत्ररक्षक गंभीर जखमी

भोपाळ – गल्ली क्रिकेटमधील भांडणे किंवा वादावादी काही नवीन नाही. अशीच एक घटना येथील गोलामंदिर भागात घडली. अर्धशतक पूर्ण करता आले नाही म्हणून फलंदाजाने चक्‍क प्रतिस्पर्धी संघातील एका क्षेत्ररक्षकालाच मारहाण केली.

या मारहाणीत क्षेत्ररक्षक गंभीर जखमी झाला आहे. एका स्थानिक क्रिकेट सामन्यात ही गंभीर घटना घडली. गोला मंदिर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एका मैदानावर संजय पलिया नावाचा खेळाडू फलंदाजी करत होता.

49 धावांवर असताना त्याचा झेल क्षेत्ररक्षक सचिन पाराशरने घेतला. त्यामुळे पलियाचे अर्धशतक पूर्ण होऊ शकले नाही व त्याने रागाच्या भरात सचिनला बॅटने मारहाण केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.