बाथरूम? नव्हे वेलनेस झोन!

आता विसरा बॅरल आणि बादल्यांनी भरलेली बाथरुम्स

भारतातील शहरवासीयांसाठी वेलनेस ही आता चैनीची गोष्ट राहिलेली नसून त्यांच्या रोजच्या आयुष्यात वेलनेसचा समावेश झाला आहे. भारतातील सातत्याने वाढती तरुण लोकसंख्या आणि विशेषत: विनियोग्य उत्पन्नामध्ये वाढ होत असलेले व त्याबरोबरच चांगले दिसण्यासाठी व चांगले राहण्यासाठी प्रयत्न करत असणारे मिलेनिअल वेलनेस पर्यायांचा अवलंब करत आहेत. घरांच्या बाबतीत दिसून येणा-या नव्या ट्रेंडमधूनही हेच स्पष्ट होते.

वेळेचा अभाव, प्रायव्हसीची आवश्‍यकता व वैयक्तिक स्वरूपातील सेवांची गरज यामुळे शहरी ग्राहक त्यांच्या घरातच स्वत:चा वेलनेस झोन्स तयार करत आहेत. संपूर्ण वैयक्तिक रुटिन जेथे केले जाते त्या बाथरूमचे रूपांतर आता वेलनेस झोन्समध्ये होऊ लागले आहे. प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट बाथरूममधून होतो. त्यामुळे, ताणतणाव निवळण्यासाठी शांतपणा मिळण्याच्या दृष्टीने एखादी खोली उपलब्ध असल्यास शांत व आरोग्यपूर्ण जीवन जगण्यासाठी मदत होऊ शकते. तुमच्या आवडीचे सेंट, संगीत, प्रकाशव्यवस्था यांचा वापर करून आणि तुमच्या आवडीची झाडे लावून किंवा अन्य वस्तूंनी सजावट करून तुम्हाला ही जागा तुमच्या मनाप्रमाणे करून घेता येऊ शकते.

बाथरूममधील अंतर्गत सजावट व वस्तू यावर खर्च केले जाणारे पैसे व वेळ यामध्ये गेल्या पाच वर्षात लक्षणीय वाढ झाली आहे. बाथरूमकडे पाहण्याचा दृष्टिकोन दररोज आन्हिक उरकण्यासाठी असलेली छोटीशी चौकोनी खोली, एवढाच मर्यादित न राहिल्याने, नव्वदीच्या दशकाच्या अखेरीस बाथरूम डिझाईन व ऍक्‍सेसरीज यातील नावीन्याचा नवा टप्पा सुरू झाला.

आज, डिझाईन व सजावट याबाबतीत अन्य खोल्यांइतके महत्त्व दिल्या न जाणा-या बाथरूमचे रूपांतर आता प्रायोगिक वेलनेस झोन्समध्ये होऊ लागले आहे. ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या स्वरूपाच्या अनुषंगाने बाथरूममध्येही परिवर्तन येत असून, बाथरूम आता लोकांच्या अन्य खोल्यांचे विस्तृत रूप व त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब ठरू लागले आहे व त्यामुळे त्यांच्यामध्ये कमालीचे परिवर्तन होऊ लागले आहे. लिव्हिंग रूम किंवा बेडरूम यांचे डिझाईन करण्यासाठी जी भावनिक गुंतवणूक दिसून येते, तीच आता बाथरूमच्या बाबतीतही दिसून येऊ लागली आहे.

याचबरोबर, हाय-एंड व ट्रेंडी फिटिंग आता सहज उपलब्ध होऊ लागल्याने बाथरूमचे रूप पूर्णत: बदलू लागले असून, त्यामध्ये आकर्षक डिझाईन आणि उपयुक्तता यांची सांगड घातली जाऊ लागली आहे. टाइल्स आणि बेसिन व शॉवर यांची निवड करण्यापलीकडे लोकांची रुची व सहभाग वाढला आहे. तुलनेने कमी लक्ष वेधून घेणा-या वॉटर हीटर श्रेणीमध्येही लोकांचा रस वाढला आहे. वॉटर हीटर श्रेणीतील नावीन्य वाढले आहे आणि त्यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून समाविष्ट केलेल्या निरनिराळ्या वैशिष्टयांमुळे वेलनेसचा संपूर्ण अनुभव मिळतो आहे. या वैशिष्टयांमध्ये, वॉटर हीटर कोठूनही व केव्हाही वापरण्यासाठी वाय-फाय, तुमच्या आवडीनुसार बाथ ठरवण्यासाठी स्मार्ट बाथ लॉजिक, सुरक्षेसाठी ऑटो डायग्नॉसिस, विजेची बचत होण्यासाठी इको फंक्‍शन यांचा समावेश आहे. पर्सनलाइज्ड हॉट शॉवर देण्यासाठी अत्यंत आधुनिक तंत्रज्ञान आणि विजेची बचत करणारी वैशिष्टये यामुळे बाथरूमचे रूपांतर वेलनेस झोन्समध्ये करण्याची प्रक्रिया पूर्ण होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.