नवी दिल्ली – दिल्लीवरुन अमेरिकेला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात वटवाघुळ आढळल्याची घटना घडली आहे. एअर इंडियाची फ्लाइट नंबर AI-105 ने शुक्रवारी पहाटे 2.20 वाजता (29 मे ची पहाट) दिल्लीवरुन अमेरिकेच्या नवार्क (न्यूजर्सी) साठी उड्डाण घेतली. टेक ऑफच्या 30 मिनीटानंतर विमानातील विझनेस क्लासमध्ये एक वटवाघुळ आढळले.
यानंतर सकाळी 3.55 वाजता विमानाची इमरजंसी लॅंडिंग झाली. वन विभागाच्या पथकाने विमानातील वटवाघुळाला बाहेर काढले. एअर इंडियाचे बोइंग 777-ER विमान दिल्ली-नवार्कसाठी वापरले जाते.
एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘DEL-EWR AI-105 फ्लाइटसाठी दिल्ली विमानतळावर लोकल स्टॅंडबाय इमरजंसी घोषित केली होती. विमानाची लॅंडिंग झाल्यानंतर कॅबिन क्रुने विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली.
शुक्रवारी उड्डाण घेतल्याच्या अर्ध्या तासानंतर वैमानिकाने एअर ट्रॅफिक कंट्रोलला विमानात वटवाघुळ असल्याची माहिती दिली. यानंतर विमानाची इमरजंसी लॅंडिंग करण्यात आली.
लॅंडिंगनंतर विमानतळाच्या कर्मचाऱ्यांना विमानात वटवाघुळ आढळले नाही. यानंतर वाइल्ड लाइफ एक्सपर्टसला बोलवण्यात आले. त्यांनी विमानात फ्यूमिगेट (धुर) केला, यानंतर त्यांना मृतावस्थेत पडलेले वटवाघुळ आढळले.