बास्केटबॉल स्पर्धा : नागपूर, सातारा, सोलापूर यांची विजयी आगेकूच

राज्य अजिंक्‍यपद व आंतरजिल्हा बास्केटबॉल स्पर्धा

पुणे: नागपूर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे, यवतमाळ व दक्षिण मुंबई या संघांनी 13 वर्षांखालील मुलांच्या गटात तर नागपूर, उत्तर मुंबई, नाशिक, ठाणे, सातारा आणि कोल्हापूर या संघांनी मुलींच्या गटात आपापल्या प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवताना राज्य बास्केटबॉल स्पर्धेत विजयी आगेकूच नोंदवली. म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीत ही स्पर्धा सुरू आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या स्पर्धेतील 13 वर्षांखालील मुलांच्या गटातील पहिल्या सामन्यात नागपूरने बीडचा 60 विरुद्ध 51 असा पराभव केला. नागपूरच्या तरणने 31, तर वेदांतने 5 गुण नोंदविले. तर बीडच्या साहिलने 22 गुण नोंदवीत एकाकी झुंज दिली. दुसऱ्या सामन्यात सोलापूरने सिंधुदुर्गचा 42 विरुद्ध 12 गुणांनी पराभव केला. सोलापूरच्या आफ्ताबने 11, तर वैश्‍नवने 7 गुण नोंदविले. तर सिंधुदुर्गच्या अथर्व रणदिवेने 6 गुण नोंदवीत एकाकी झुंज दिली.

तीसऱ्या सामन्यात कोल्हापूरने अमरावतीचा 38 विरुद्ध 28 असा पराभव केला. यावेळी कोल्हापूरच्या यशवर्धन जाधवने 14 गुण करत विजयात मोलाचा वाटा उचलला. अमरावतीच्या वेदांत हिराळकरने 9 गुण नोंदवत एकाकी लढत दिली. चौथ्या सामन्यात ठाणेच्या संघाने रत्नागिरीच्या संघाचा 38 विरुद्ध 5 असा एकतर्फी पराभव करत आगेकूच केली. यावेळी ठाणेच्या व्यंकटने 8 गुण करत विजयात महत्वापूर्ण कामगीरी केली तर रत्नागिरीच्या आदित्य अनेकरने 3 गुण करत एकाकी लढत दिली. तर यवतमाळने अकोला संघाचा 34 विरुद्ध 18 अशा गुणांनी पराभव करत स्पर्धेत आगेकूच केली. यावेळी यवतमाळच्या वेदांत सिंगने 10 गुण करत विजयात मोलाची कामगिरी नोंदवली तर अकोलाच्या यश खंदारेने 8 गुण करत त्याला एकाकी लढत दिली.

दक्षिण उत्तर मुंबईने नांदेडचा 57 विरुद्ध 12 असा पराभव केला. यावेळी मुंबईच्या झकाऊल्लाह अन्सारीने 13 गुण केले. फराझ शेखने 8 गुण करत त्याला सुरेख साथ दिली. तर नांदेडच्या देवांश अजमेराने 4 गुण करत एकाकी लढत दिली. तर सातारा संघाने पालघरचा 36 विरुद्ध 9 गुणांनी परभव करताना स्पर्धेत विजयी अूागेकूच नोंदवली. यावेळी साताराच्या सिद्धार्थ बेलेकर आणि आदित्य जाधव यांनी प्रत्येकी 8 गुण नोंदवले. तर पालघरच्या कुशल पाटीलने 4 गुण करत एकाकी झुंज दिली.

मुलींच्या गटात पहिल्या सामन्यात नागपूरने कोल्हापूरचा 40 विरुद्ध 24 असा पराभव केला. यावेळी नागपूरच्या शोमिरा भिडेने 12 गुण नोंदविले. कोल्हापुरच्या पूर्वा भोसलेने 8 गुण करत एकाकी लढत दिली. उत्तर मुंबईने अमरावतीचा 43 विरुद्ध 2 असा एकतर्फी पराभव केला. उत्तर मुंबईच्या रिचा रावोने (10 गुण) विजयात मोलाचा वाटा उचलला.

नाशिकच्याने सिंधुदुर्गचा 38 विरुद्ध 2 गुणांनी पराभव केला. यावेळी नाशिकच्या सिमरन भावदारने 8 गुण करताना विजयात मोलाचा वाटा उचलला. तसेच ठाण्याने नांदेडला 25 विरुद्ध 9 असे नमविले. ठाण्याच्या मृण्मयी कुलकर्णीने 7 गुणनोंदवीत विजयात मोलाचा वाटा उचलला. पाचव्या सामन्यात साताऱ्याने अहमदनगरचा 40 विरुद्ध 4 असा पराभव केला. सातारच्या श्रावणी बदापुरेने 6 गुण करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. कोल्हापूरने पालघरचा 37 विरुद्ध 3 गुणांनी पराभव केला. कोल्हापूरच्या पूर्वा भोसलेने 16 गुण नोंदवीत विजयात मोलाचा वाटा उचलला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)