Five New Sports at LA Olympics 2028 Schedule & Details : पॅरिस ऑलिम्पिक 2024 आता संपले आहे. तमाम क्रीडाप्रेमींच्या नजरा आता पुढील ऑलिम्पिककडे लागल्या आहेत. आता खेळाडू पुढील ऑलिम्पिकच्या तयारीत व्यस्त आहेत. पुढील ऑलिम्पिक 2028 मध्ये होणार आहे, ज्यामध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये तीन खेळांचे पुनरागमन होत असून दोन खेळांमध्ये पदार्पण होणार आहे. अशा परिस्थितीत, पुढील ऑलिम्पिक कुठे आणि केव्हा सुरू होईल, यासोबतच ते पाच नवीन खेळ कोणते आहेत? हे जाणून घेऊया….
पुढील ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार?
पॅरिस ऑलिम्पिकनंतर पुढील उन्हाळी ऑलिम्पिक अमेरिकेत खेळवले जाणार आहे. 2028 मध्ये अमेरिकेतील लॉस एंजेलिस शहरात याचे आयोजन केले जाईल. लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 चा उद्घाटन समारंभ 14 जुलै 2028 रोजी प्रस्तावित आहे आणि त्याचा समारोप समारंभ 30 जुलै 2028 रोजी प्रस्तावित आहे.
पाच नवीन खेळ कोणते आहेत?
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 मधून ब्रेकिंगचा खेळ काढून टाकण्यात आला आहे, जो पॅरिस ऑलिंपिक 2024 मध्ये एक नवीन खेळ होता. तथापि, 2028 च्या गेम्समध्ये पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे, ही क्रीडाप्रेमींसाठी एक नवीन रोमांचक बातमी आहे. 2028 च्या गेम्समध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल (Baseball/softball), फ्लॅग फुटबॉल (flag football), लाक्रोस (lacrosse),स्क्वॅश (squash) आणि टी-20 क्रिकेट (cricket) या पाच नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे.
IOC Session approves @LA28’s proposal for 5⃣ additional sports:
⚾Baseball/🥎softball, 🏏cricket, 🏈flag football, 🥍lacrosse and ⚫squash have been officially included as additional sports on the programme for the Olympic Games Los Angeles 2028. #LA28 pic.twitter.com/y7CLk2UEYx
— The Olympic Games (@Olympics) October 16, 2023
आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले की, “या पाच नवीन खेळांची निवड अमेरिकन क्रीडा संस्कृतीशी सुसंगत आहे आणि यामुळे लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 वेगळे ठरेल. या खेळांच्या समावेशामुळे ऑलिम्पिक चळवळीला खेळाडू आणि चाहत्यांच्या नवीन समुदायांशी जोडण्याची अनोखी संधी मिळेल.”
Paris Olympics 2024 : नीरज चोप्रा अचानक पॅरिसहून थेट जर्मनीला झाला रवाना, समोर आलं मोठं कारण….
पाच नवीन खेळांचा ऑलिम्पिक इतिहास…
लॉस एंजेलिस ऑलिम्पिक 2028 हा क्रिकेटसाठी एक महत्त्वाचा प्रसंग आहे, कारण पॅरिस ऑलिम्पिक 1900 नंतर हा खेळ प्रथमच ऑलिंपिक खेळांमध्ये परतणार आहे. क्रिकेट व्यतिरिक्त, टोकियो 2020 मध्ये खेळल्या गेलेल्या ऑलिम्पिक खेळांमध्ये बेसबॉल/सॉफ्टबॉल देखील परत येत आहेत.
Wrestling : कोल्हापूरचा समर्थ महाकवे कॅडेट जागतिक कुस्ती स्पर्धेसाठी ठरला पात्र…
1904 आणि 1908 मध्ये ऑलिम्पिकचा भाग असलेला लॅक्रोस ऑलिम्पिकमध्ये परतणार आहे. फ्लॅग फुटबॉल आणि स्क्वॅश, जे अमेरिकन क्रीडा संस्कृतीचे महत्त्वाचे भाग आहेत, 2028 मध्ये लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये त्यांचे ऑलिम्पिक पदार्पण करतील.