नवी दिल्ली : कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी स्वेच्छेने मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पार्श्वभूमीवर बसवराज बोम्मई यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
Basavaraj Bommai sworn-in as the new Chief Minister of Karnataka pic.twitter.com/4RPPysdQBa
— ANI (@ANI) July 28, 2021
बसवराज बोम्मई यांनी आज ११ वाजता मुख्यमंत्री पद व गोपनीयतेची शपथ घेतली. राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी त्यांना शपथ दिली. शपथविधी दरम्यान माजी मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा उपस्थित होते. या बरोबरच भाजपाचे इतर अनेक बडे केंद्रीय व राज्य ज्येष्ठ नेतेही या कार्यक्रमात उपस्थित होते. बोम्मई कर्नाटकचे २३ वे मुख्यमंत्री असणार आहेत.
बसवराज बोम्मई यांच्याविषयी….
येडियुरप्पांप्रमाणेच बसवराज बोम्मई हे देखील लिंगायत समाजाचे नेते असून ते येडियुरप्पांचेच निकटवर्तीय मानले जातात. ६१ वर्षीय बसवराज बोम्मई यांनी आत्तापर्यंत गृहविभाग, कायदे विभाग, सांस्कृतिक कार्यमंत्रीपद अशा अनेक महत्त्वाच्या पदांची जबाबदारी आत्तापर्यंत पार पाडली.
मंगळवारी त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी बोम्मई यांनी भाजपाचे केंद्रीय निरीक्षक धर्मेंद्र प्रधान, जी. किशन रेड्डी आणि अर्जुन सिंह यांची बंगळुरूमध्ये भेट घेतली. याशिवाय, त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी पक्षाच्या ४० आमदारांनी देखील त्यांची भेट घेतल्याचं देखील सांगितलं जात आहे.