बार्शीच्या आमदारांना आंधळकरांसाठी धमकी

मुंबई : पुण्यातील माजी पोलिस अधिकारी आणि शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांच्या विरोधात राजकारण कराल तर मुंबईतून बाहेर पडू देणार नाही अशी धमकी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांना देण्यात आली. आ. राऊत यांचे स्वीय सहायक प्रशांत खराडे यांना ही धमकी देण्यात आली. पनवेल येथील नंदू उर्फ बाबा पाटील याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बार्शी शहर पोलीस ठाण्यात भांदवि 507 कलम नुसार गुन्हा दाखल झाला आहे.

आमदार राऊत आणि आंधळकर यांचे वैर सर्वश्रुत आहे. या दोघांचे कार्यकर्ते गेल्यावर्षी हाणामारीवर उतरले होते. आंधळकर यांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणात पदार्पण केले. शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर यांनी पोलीस दलातून निवृत्त झाल्यानंतर दहा वर्षांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेना बार्शीच्या तळागाळात रुजविण्याचे काम आंधळकर यांनी केले. 2019 च्या निवडणुकीत त्यांना उमेदवारी जाहीर होईल असे वाटत असतानाच राष्ठ्रवादीच्या दिलीप सोपलांनी थेट मातोश्रीवर जाऊन शिवबंधन बांधून घेतले. सोपलांच्या राष्ट्रवादी सोडल्याने बार्शीत राष्ट्रवादीला खिंडार पडले, तर शिवसेनेतही अंतर्गत वाद उफाळून आला. थेट बंडाची भाषा करण्यात आली. या सर्वांमध्ये भाऊसाहेब आंधळकर हे आघाडीवर होते. मात्र, त्याच आंधळकरांनी थेट दिलीप सोपलांच्या मागे राहू, असं सांगत प्रचाराचा नारळ फोडण्याचा आग्रह केला आणि सोपलांनी तो पूर्णही केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.