- कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई
- नोटीस पाठवण्याचे काम पुढील टप्प्यात
पुणे – करोना पार्श्वभूमीवर हे वर्ष अनेकांनी आपल्या आयुष्यातून “डिलिट’ केले आहे. त्यामुळे येणारे वर्ष तरी किमान आरोग्याची समस्या घेऊन येणारे, भीतीदायक, चिंतेच्या सावटाखाली नसावे अशी कामना करत अनेकजण नव्या वर्षाचे स्वागत करण्याला तयार झाले आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे ओसंडून वाहणारे बार, वाइन शॉप्स, त्यांच्या जागेवर तपासणीला अन्न आणि औषध प्रशासनाने सुरुवात केली आहे.
नवे वर्षात तरी मोकळा श्वास घ्यायला मिळावे, अशी अपेक्षा करत अनेकांनी नव्या वर्षाचे प्लॅन आखले आहेत. तसेच बरेच दिवस बंद असलेल्या व्यवसायांनाही आता गती मिळत आहे. त्यातून आता 31 डिसेंबरचे स्वागत करण्यासाठी सगळे सज्ज झाले असून अन्न आणि औषध प्रशासनाने या जल्लोषावर लक्ष ठेवले आहे.
सुरवातीच्या टप्प्यात शहरातील बार आणि वाइन शॉप्सच्या तपासणीला सुरुवात केली असून, कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अन्न आणि औषध प्रशासनातील विभागीय आयुक्त शिवाजी देसाई यांनी सांगितले.