‘लव्ह जिहाद’विरोधी कायदा लागू होताच नवीन कायद्यानुसार पहिला गुन्हा दाखल

लखनौ – धर्मांतर बंदी कायद्यानुसार उत्तर प्रदेशमध्ये पहिला गुन्हा नोंदवण्यात आला. एका मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून बरेली जिल्ह्यातील देवरणी पोलिस ठाण्यात हा गुन्हा नोंद झाला, असे पोलिसांनी सांगितले.

या पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शरीफनगर भागातील टीकाराम यांनी ही तक्रार दिली आहे. अवैश अहमद या तरूणाने आपल्या मुलीला फुस लावून धर्मांतर करण्याच्या प्रयत्नात असल्याची फिर्याद त्यांनी दिली,अशी माहिती उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य सचिव अवनिश अवस्थी यांनी दिली. त्याच्यावर भारतीय दंड संहिता आणि नव्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

टीकराम यांची कन्या आणि अहममद हे 12 वीत एका वर्गात शिकत होते. तीन वर्षापुर्वी अहमदने या युवतीला धर्मांतर करून विवाह करण्यसाठी दबाव टाकण्यास सुरवात केली. त्याला या युवतीने विरोध केला तेंव्हा तिला पळवून नेण्याची धमकी दिल्याचा आरोप टिकराम यांनी केला. टिकराम यांना आपल्या कन्येचा विवाह जुलै महिन्यात अन्यत्र केला.

त्यानंतरही अहमद त्या कुटुंबाला त्रास देत होता. त्यांनी सासूरवाडीतून मुलीला परत आणण्यासाठी दबाव टाकण्यास सुरवात केली त्यासाठी धमकावून तिचे धर्मांतर घडवून विवाह करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे फिर्यादित म्हटले आहे. केवळ विवाहासाठी धर्मांतर घडवण्याच्या विरोधात उत्तर प्रद्रशात चार दिवसांपुर्वी कायदा बनवण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.