बार्सिलोना : लंडन ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या साईना नेहवालने गुरूवारी युक्रेनच्या मारिया युलिटिनाचा सरळ गेममध्ये पराभव करीत बार्सिलोना स्पेन मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित केला आहे.
कारकीर्दीतील चौथ्या ऑलिम्पिक स्पर्धेस पात्र होण्यासाठी धडपडणा-या साईनाने महिला एकेरीच्या दुस-या फेरीत मारियाचा २१-१०, २१-१९ असा पराभव करत विजय नोंदविला.
Barcelona Spain Masters 2020
WS – Round of 16
21 21 🇮🇳Saina NEHWAL🏅
10 19 🇺🇦Maria ULITINA🕗 in 28 minutes
https://t.co/EIErtNjLJL— BWFScore (@BWFScore) February 20, 2020
आता उपांत्यपूर्व फेरीत साईनासमोर थायलंडच्या तिस-या मानांकित बुसानन ओंगबामरूंगफान हिचे आव्हान असणार आहे. बुसान हिच्याकडून मागील दोन लढतींमध्ये साईनाला पराभव पत्करावा लागला आहे.
दरम्यान, पाचव्या मानांकित साईनाने पहिल्या फेरीत जर्मनीच्या व्होनी लीवर हिचा २१-१६, २१-१४ असा पराभव करत आगेकूच केली होती.