बार्सिलोनाचा मॅंचेस्टर युनायटेडवर दणदणीत विजय

बार्सिलोना  -चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या परतीच्या लढतीत मेस्सीने केलेल्या दोन गोलमुळे बार्सिलोनाने मॅंचेस्टर युनायटेडला 3-0 अशी धूळ चारत उपांत्य फेरी गाठली.

गेल्या आठवड्यात झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या पहिल्या टप्प्यातील लढतीत बार्सिलोनाने 1-0 असा विजय मिळवला होता. त्यामुळे 4-0 अशा गोल फरकाच्या बळावर बार्सिलोनाने युनायटेडचा धुव्वा उडवला.

सुरुवातीपासूनच आक्रमणावर भर देणाऱ्या बार्सिलोनासाठी मेस्सीने 16व्या मिनिटाला 20 मीटर लांब अंतरावरून गोलजाळ्याचा वेध घेऊन संघाचे खाते उघडले. या गोलमधून युनायटेड सावरत नाही, तोच 20व्या मिनिटाला त्यांचा गोलरक्षक डेव्हिड डी गेआने सुमार बचाव केल्यामुळे मेस्सीने लगावलेल्या हलक्‍या फटक्‍याचे गोलमध्ये रूपांतर झाले.
मध्यंतरापर्यंत 2-0 अशी आघाडी कायम राहिल्यामुळे युनायटेड जोरदार पुनरागमन करेल, अशी अपेक्षा होती. मात्र बार्सिलोनाच्या बचावपटूंनीदेखील तितक्‍याच तोडीने खेळ करत जेसी लिंगार्ड, पॉल पोग्बा, रोमेलू लुकाकू यांसारख्या आक्रमकांना रोखले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.