स्पेन – स्पेनमध्ये सुरू असलेल्या ला लीगा फुटबॉल स्पर्धेत बार्सिलोनाने सेल्टा व्हिगोचा पराभव करत आपली आगेकूच कायम राखली आहे. बार्सिलोनाचा व्हिगोवर 3-0 अशी सहज मात केली.
त्यात अन्सू फातीने 11 व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यानंतर 51 व्या मिनिटाला व्हिगोचा गोलकिपर लुकास ओलान्झाने स्वयंगोल केला व एक प्रकारे बार्सिलोनालाच फायदा करुन दिला. त्यानंतर सर्जी रॉबटने लगेचच गोल करत बार्सिलोनाला मोठा विजय प्राप्त करुन दिला.
या सामन्याद्वारे त्यांनी स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात बार्सिलोनाच्या क्लेमेंट लेंगलेटला रेफ्रींनी रेडकार्ड दिल्याने त्यांना 10 खेळाडूंसहच खेळावे लागले.