बारामती (प्रतिनिधी) : बारामती शहरातील आणखी तिघांना कोरोनाची बाधा झाले असल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे. शहरातील जळोची, पानगल्ली तसेच वसंत नगर येथे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे बारामतीतील कोरोना बाधितांची संख्या ४० वर पोहोचली आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे बारामतीकरांची चिंता वाढली आहे.
शहरातील जळोची येथील कोरोना संक्रमित रुग्णाचा १५ वर्षीय मुलाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे. वसंत नगर येथील रुग्ण सेविका तसेच पान गल्ली येथील एका पुरुषास कोरोना ची लागण झाली आहे. दिवसेंदिवस बारामती शहरात कोरोना संक्रमित यांची संख्या वाढत आहे.
लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर बारामती पूर्वपदावर आली आहे. त्यामुळे शहरात व तालुक्यात कोरोना संक्रमीत रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.