बारामती – बारामती तालुका पंचायत समितीच्या उप’ सभापतीपदी पणदरे येथील रोहित बळवंत कोकरे यांची निवड करण्यात आली. बारामती पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी झालेल्या सदस्यांच्या बैठकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सूचनेनुसार उपसभापतीपदी रोहित कोकरेयांची निवड करण्यात आली.
सदर निवडीची घोषणा बारामती तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर यांनी केली.रोहित कोकरे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. त्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. याप्रसंगी पंचायत समितीचे सभापती निता फरांदे,माजी उपसभापती प्रदीप धापटे, सदस्य व पदाधिकारी यांनी नवनिर्वाचित उपसभापतीना शुभेच्छा दिल्या.
उपमुख्यमंत्री अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांचे नेतृत्वाखाली व तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांच्या सहकार्याने प्रामाणिकपणे काम करत शासकीय योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याबरोबरच तालुक्याचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटिबद्ध राहील अशी ग्वाही नवनिर्वाचित उपसभापती रोहित कोकरे यांनी दिली.
यावेळी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष संभाजी होळकर,सभापती निता फरांदे, गटनेते प्रदीप धापटे, पंचायत समिती सदस्य भारत गावडे,राहुल भापकर,राहुल झारगड, संजय भोसले, सदस्या अबोली भोसले, शारदा खराडे, मेनका मगर, लिलावती गावडे, दूध संघाचे चेअरमन संदीप जगताप,दूध संघाचे संचालक संजय देवकते, संजय जगताप, तालुका पदाधिकारी तालुका राष्ट्रवादी लीगल सेलचे रवींद्र माने, तालुका सोशल मिडिया चे सुनिल बनसोडे, शहर सोशल मिडिया अध्यक्ष तुषार लोखंडे, तालुका उपाध्यक्ष मिलिंद मोरे, सभापती सहायक सचिव सोमनाथ कदम, वैभव पवार, त्याचप्रमाणे निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार मा.विजय पाटील तसेच गटविकास अधिकारी मा. राहुल काळभोर, कक्ष अधिकारी कुंदन दराडे,अधिक्षक किरण जगताप,पंचायत समितीचे अधिकारी सर्व कर्मचारी तसेच निवडीनंतर राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.