जळोची – आज सकाळी बारामती शहर व तालुक्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण आढळून न आल्याने बारामतीकरांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. मात्र सायंकाळी आलेल्या अहवालानुसार पुन्हा नव्याने दोन रुग्णांची भर पडली आहे. काल घेतलेल्या नमुन्यांपैकी प्रतीक्षेत असलेल्या नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यामध्ये बारामती शहरातील देसाई इस्टेटमधील रुग्णाच्या संपर्कातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.