बारामती (प्रतिनिधी): बारामती येथील दोन कोरोना संक्रमित व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूनंतर बारामतीतील मृत्यूची संख्या ८ वर पोहोचली आहे.
गुणवडी तालुका बारामती येथील 64 वर्षीय कोरोना संक्रमित व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तसेच भिकोबा नगर येथील कोण संक्रमीत याचा देखील मृत्यू झाला. गुणवडी येथील 64 वर्षीय व्यक्ती रात्री करुणा संक्रमित संक्रमीत असल्याचे आढळून आले तर पहाटे या व्यक्तीचा मृत्यू झाला.
काल दुपारपर्यंत पाठवलेल्या 53 स्वॅब नमुन्यांपैकी एकूण 50 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 49 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर गुणवडी येथील 64 वर्षीय पुरुषाचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे.
तीन अहवाल अध्याप प्रतीक्षेत आहेत. तसेच गुणवडी येथील ज्या रुग्णाचाअहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे त्याचा पहाटे मृत्यू झालेला आहे .उपचार घेत असलेल्या भिकोबा नगर येथील रुग्णाचा रात्री उशिरा मृत्यू झालेला आहे.