मोरगांव – मोरगाव (ता. बारामती) परीसरात आज दि २० रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास हलक्या ते मध्यम पावसाचा शिडकावा पडला. तर तरडोली, आंबी बु, आंबी खुर्द येथे पावसाबरोबर गारांचा वर्षाव झाला.
सलग दोन दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर आज मोरगांव परीसरातील मोरगाव , तरडोली , देऊळगाव रसाळ आंबी बु, आंबी खुर्द, जोगवडी, माळवाडी परीसरात हलक्या मध्यम पावसाचा वर्षाव झाला. यामुळे दिवसभर उष्णतेने हैराण असलेल्या लोकांनी मनमुराद पावसात भिजण्याचा आनंद घेतला. पंधरा ते वीस मिनिटे वाऱ्यासह पाऊस सुरु होता.
अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनासह महीलांची चांगलीच तारांबळ उडाली. उन्हात वाळत टाकलेला गहु, ज्वारी तात्काळ गोळा करुन झाकावी लागली. तसेच तरडोली, आंबी बु, आंबी खुर्द येथे पावसाबरोबर गारांचा शिडकावा झाला. यामुळे उभ्या गव्हाच्या ओंब्या काही प्रमाणात झडल्या असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातवरण पसरले आहे.