बारामती : शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात दोन विद्यार्थ्यांच्या भांडणात एका विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे.
दोन विद्यार्थ्यांनी एकमेकांना हाणामारी केली. तसेच कोयत्याने एकमेकांना वार केल्याने यात एका विद्यार्थ्यांचा जीव गेल्याची घटना सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. या घटनेने बारामती शहरात खळबळ उडाली आहे.
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयात महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये हाणामारी झाली. एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत कोयत्याने वार झाल्याने तो गंभीर जखमी झाला. त्यास तातडीने बारामतीत दवाखान्यात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.
बारामतीत झालेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, हा धक्कादायक प्रकार आज सकाळी अकराच्या सुमारास घडली. दोन्ही विद्यार्थी याच महाविद्यालयात शिकत आहेत. या दोघांमध्ये काही कारणावरून मारहाण सुरू झाली. मारहाण करणाऱ्या विद्यार्थ्यांबरोबर आणखी एक विद्यार्थी आला. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यावर आवारातच त्याच्यावर कोयत्याने वार केला. यात विद्यार्थी गंभीर जखमी झाला.जमखी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.