पुणेः बारामती तालुक्यातून एक हादरवून सोडणारी घडना समोर आली आहे. तालुक्यातील पणदरे गावात एका परप्रांतीय महिलेवर बळजुबरीने लैंगिक अत्याचार करून तिला एका पत्राच्या शेडमध्ये डांबूल ठेवल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण (ग्रामीण) शाखा व माळेगाव पोलिसांनी संयुक्त कामगिरी करून पीडित महिलेची सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पोपट धनसिंग खामगळ (वय २५ रा. खामगळवाडी, ता. बारामती ) याच्यावर माळेगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी खामगळ याचा पणदरे गावात हॅाटेल व्यवसाय आहे. नौकरी देण्याच्या बहाण्याने त्याने सदर महिलेला पणदरे येथे घेऊन आला होता. ३ जानेवारी रोजी महिला पत्र्याच्या शेडमध्ये झोपली असताना तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकाराबाबात कोणाला काही सांगितले तर तुझा खून करील, अशी धमकी दिली होती.
या घटनेची गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी पाहणी केली असता परप्रांतीय महिला शेडमध्ये आढळून आली. तिने पोलिसांना तिच्यासोबत घडलेला संपूर्ण घटना सांगितली. तसेच पोलिसांनी तिच्याकडे अधिक चौकशी केली असता पुण्यातील एका मैत्रीणीकडून आरोपी पोपट खामगळ याच्या सोबत ओळख झाल्याची सांगितले. सदरची कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड यांना सांगून पुढील कार्यवाही करण्याचे आदेशाची कारवाई करण्याच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला देण्यात आले होते. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी घेऊन पुढील तपास पोलीस करीत आहेत.
फोनवरून दिली माहिती
दरम्यान, ११ जानेवारी रोजी खुनाची धमकी देऊन आरोपीने पीडित महिलेला मारहाण करत जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला. तसेच हॉटेल कामासाठी आलेल्या जोडप्यातील महिलेला संबंध ठेवण्यास तयार कर, असे सदर पीडित महिलेला सांगितले. मात्र, पीडित महिलेने त्याची मागणी पूर्ण न केल्याने पुन्हा महिलेला मारहाण करून पत्र्याच्या खोलीत जबरदस्तीने डांबून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित महिलेने हॉटेल कामासाठी आलेल्या जोडप्यातील महिलेच्या फोनवरून तिच्या नातेवाईकास घडलेला प्रकार सांगितला.