बारामती | शिर्सुफळ येथील शिरसाई कालव्याची पाईपलाईन फुटली, लाखो लिटर पाणी वाया..

डोर्लेवाडी (प्रतिनिधी) : बारामती तालुक्याच्या जिरायत भागाला वरदान ठरलेली शिरसाई उपसा सिंचन योजनेची शिर्सुफळ भागात पाईपलाईन आज ( बुधवारी ) सकाळी फुटली.

क्षमतेपेक्षा जास्त विद्युत मोटारी चालु केल्याने पाईप लाईन वरती अतिदाब येऊन शिर्सुफळ येथील म्हेत्रे वस्तीवर रेल्वेलाईन लगत असलेली पाईप लाईन आज सकाळी फुटली असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

 

अचानक पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. मात्र, म्हेत्रे वस्तीवरील अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणावर पाणी घुसल्याने जीवनावश्यक वस्तू आणि साहित्य पाण्याखाली गेले यात मोठे नुकसान झाले आहे. 

“क्षमतेपेक्षा जास्त विद्युत मोटारी चालु केल्याने पाईप लाईन वरती अतिदाब येऊन ती फुटली आहे . पाण्याचा वेग जास्त असल्याने या पाण्यात अनेकांच्या घरासमोरील कोंबड्या, शेळ्या, मोटारसायकली वाहून गेल्या आहेत. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे आता या घटनेला जबाबदार असणाऱ्या अधिकार्‍यावर कारवाई व्हावी आणि यात नुकसान झालेल्या नागरिकांना लवकरात लवकर भरपाई मिळावी अन्यथा की पाईप लाईन चालू करु देणार नाही असा इशारा माझी सरपंच अतुल शिवरकर यांनी दिला आहे.

तब्बल एक ते दीड तासानंतर या योजनेवर काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आले. 

 

त्यानंतर त्यांनी विद्युत पुरवठा बंद करून फुटलेली पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम सुरू केले. मात्र तोपर्यंत या फुटलेल्या पाईप मधून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.