ABDUL SATTAR ON PAWAR FAMILY – शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यापासून सुप्रियाताई सुळे अजित दादा पवार रोहित दादा पवार यांच्यापर्यंतचे सर्वच पवार चांगले आहेत. त्यांची पॉवर अशीच कायम राहो अशी प्रार्थना करतो असे उद्गार महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी केले..
बारामती येथील माळेगाव येथे एग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी कृषिमंत्री सत्तार बारामतीत आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र दादा पवार उपस्थित होते.
बारामतीत कृषी क्षेत्रासह विविध क्षेत्रात झालेला विकास पाहून महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार प्रभावित झालेले पाहायला मिळाले. कृषीक कृषी प्रदर्शन 2023 या कृषी प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मंत्री सत्तार बारामतीत आले होते. मंत्री सत्तार यांनी कृषी प्रदर्शन पाहणी नंतर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांचे भरभरून कौतुक केले.
मंत्रिमंडळात महिलांना स्थान नाही.मंत्रालयात मंत्री भेटत नाहीत कोणत्या मंत्राकडे कोणता खाते आहे. हे सामान्यांना अद्याप माहिती नसल्याचा सरकारवर आरोप होत आहे.. यावर बोलताना मंत्री सत्तार म्हणाले की, आरोप करणे हे आरोप करणाऱ्यांचे काम असते वेगवेगळ्या खात्याच्या मंत्र्यांना वेगवेगळी जबाबदारी असते..आज मी बारामतीत आहे त्याच वेळी माझ्या कार्यालयात कोणी गेले तर मी त्यांना उपलब्ध होऊ शकत नाही…जिल्ह्याचे पालकमंत्री विभागाचे काम मतदार संघातील काम आठवड्यातील तीन दिवस आम्ही मंत्रालयात असतो असे म्हणाले.
…. एका वाक्यात उत्तर | ABDUL SATTAR ON PAWAR FAMILY
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार या प्रश्नाला एका वाक्यात उत्तर देताना मंत्री सत्तार म्हणाले की, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री बोलतील तेव्हा मंत्रिमंडळ विस्तार होईल.