बारामती | डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या निविदा त्वरित काढा – अजित पवार यांचे आदेश

बारामती- आमराई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतिच्या ९६ घरांच्या निविदा त्वरित काढण्याचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगर परिषदेला दिले आहेत. ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर व नगरसेवक बिरजू मांढरे यांच्या मागणी पत्राप्रमाणे अजित पवार यांनी हे आदेश दिले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमध्ये ९६ कुटुंबे राहत होती. पूर्वीची इमारत १९७६ साली बांधलेली होती व ती मोडकळीस आल्यामुळे तेथे राहणाऱ्या कुटुंबीयांचे जीवन धोक्यामत आले होते. त्यामुळे तेथील नागरिकांचे जळोची येथे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे.

तसेच सदर जागेवर क्रीडांगणाचे आरक्षण होते ते पूर्णपणे उठवले गेले असून त्या ठिकाणी आर. सी. सी. मधील ९६ घरे बांधली जाणार असून त्यातील रहिवाशांना पंतप्रधान आवास योजनेमध्ये समाविष्ट करून घेण्यात आले आहे व नवीन बांधलेली घरे त्याच लाभधारकांना मिळणार आहेत. या आदेशामुळे आंबेडकर वसाहतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.