बारामती- बांधकाम व्यवसायात सेंट्रींग साठी लागणाऱ्या 75 हजार रुपये किमतीच्या 50 प्लेटा चोरणाऱ्या एकाला बारामती शहर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बकुळया नकट्या काळे (वय 20 रा. मळद ,ता. बारामती) याला या प्रकरणी अटक करण्यात आले आहे.
बाबासाहेब बाबूजी आटोळे (वय 38) व्यवसाय सेंट्रींग राहणार मळद रोड बारामती यांनी फिर्याद दिली आहे. कसबा जामदार रोड या ठिकाणी बांधकामाची साईट चालू आहे. त्या ठिकाणी बांधकामासाठी सेंट्रींग ला वापरण्यात येणाऱ्या एकूण 50 लोखंडी प्लेट चोरी झाले आहेत. त्याची एकूण किंमत 75 हजार रुपये आहे.
साइटवर असणाऱ्या वाचमेनने त्या कामावर असणाऱ्या एका व्यक्ती ने सदर चोरी केल्याची घटना सांगितली होती त्यामुळे त्यालाही त्या गुन्ह्यात अटक केली होती परंतु सदर आरोपीकडून काहीही निष्पन्न झाले नाही.
बारामती शहर पोलीस ठाण्याचे तपास पथक हे या गुन्ह्याबाबत सतत गोपनीय माहिती घेत होते. त्याप्रमाणे तपास पथकाच्या गोपनीय बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की आरोपी नामे बकुळया नकट्या काळे याने एका विधिसंघर्षग्रस्त बालक सोबत सदरच्या प्लेट चोरलेल्या आहेत.
सदर माहितीच्या आधारे तपास पथकाने सदर आरोपीला ताब्यात घेऊन त्याला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या संपूर्ण 50 प्लेटा 75 हजाराच्या जप्त केला आहे. सदरची कारवाई माननीय विभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, पोलीस उपनिरीक्षक गणेश पाटील , पोलीस हवालदार रामचंद्र शिंदे, पोलीस नाईक दशरथ कोळेकर ,कल्याण खांडेकर ,पोलीस शिपाई मनोज पवार ,बंडू कोठे, दशरथ इंगोले ,सचिन कोकणे यांनी केली.