बारामती (प्रतिनिधी) : नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजने अंतर्गत बारामती नगरपरिषद करीता १ कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र जेवरे यांनी याबाबत पाठपुरावा केला. मुस्लीम आम जमात कब्रस्थान, मुजावर वाडा अंतर्गत सुधारणा करण्यासाठी १५ लाख रुपये मंजूर झाले आहेत.
शिवधाम स्मशानभूमी लिंगायत कोष्टी समाज अंतर्गत सुधारणा करणे २० लाख राजयोग ध्यानकेंद्र, ओपनस्पेस वाघोलिकर पार्क अशोकनगर बारामती येथील बगीचा अंतर्गत कामे करणे ५० लाख विमलधाम सोसायटी, भिगवण रोड बारामती बगीच्या अंतर्गत कामे करणे १५ लाख ,प्रभाग क्र. १६ येथे ओपन जिम तयार करणे. इत्यादी कामे या निधीच्या माध्यमातून होणार आहेत.
मुख्यमंत्र्यांचे सहकार्य :
नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान या योजतेअंतर्गत बारामती नगर परिषदेसाठी एक कोटींचा निधी मिळाला आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विशेष सहकार्य मिळाले. बारामतीच्या विकास कामासाठी मी निधीची मागणी केली होती. त्याबाबत सदर कामांना निधी पुरवण्याचे सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या व तात्काळ निधी मंजूर झाला.
– सुरेंद्र जेवरे (शिवसेना पुणे जिल्हा प्रमुख)